रिंकू राजगुरूने मराठमोळ्या अंदाजात दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 11:45 AM2021-02-19T11:45:01+5:302021-02-19T11:47:18+5:30

रिंकूने मराठमोळ्या अंदाजात शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Rinku Rajguru gives Shiva Jayanti wishes on instagram | रिंकू राजगुरूने मराठमोळ्या अंदाजात दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

रिंकू राजगुरूने मराठमोळ्या अंदाजात दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

googlenewsNext
ठळक मुद्देरिंकूची ही पोस्ट तिच्या चाहत्यांना आवडत आहे. केवळ एका तासांत नऊ हजाराहून अधिक लाईक्स या पोस्टला मिळाल्या आहेत.

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. रिंकूने शिवजंयतीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

रिंकूने मराठमोळ्या अंदाजात शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, छत्रपती शिवराय हे नावच सर्वसमावेशक आहे. जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणे महत्वाचे आहे. स्वार्थासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी लढणे महत्वाचे आहे. राजा माझा सुखकर्ता... शिवजयंतीच्या शुभेच्छा...

रिंकूची ही पोस्ट तिच्या चाहत्यांना आवडत आहे. केवळ एका तासांत नऊ हजाराहून अधिक लाईक्स या पोस्टला मिळाल्या आहेत. 

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा ॲमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Rinku Rajguru gives Shiva Jayanti wishes on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.