हिंदी आणि मराठी सिनेमा तसेच मालिकांमध्ये आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री रेशम टिपणीस मध्यंतरीच्या काळात तितकी चर्चेत नव्हती. मात्र बिग बॉस मराठी रिएलिटी शोमुळे पुन्हा एकदा तिनं रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यानंतर तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. 


बिग बॉस मराठीमध्येही रेशमचा हा बोल्ड, बिनधास्त आणि तितकाच फटकळ अंदाज रसिकांना भावला होता. जे आहे ते मान्य करताना तिने कधीच मागे पुढे पाहिलं नाही. जीवनातील कुठलीही खासगी गोष्ट असो किंवा मग एखादी भूमिका, रेशमला जे आवडते ते ती करते. रेशमला दोन मुलं असून एक मुलगी व मुलगा आहे. तिची लेक फोटोग्राफर असून तिचं नाव रिशिका आहे.

रिशिका आईप्रमाणेच सुंदर आणि तितकीच ग्लॅमरस आहे. 

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही जणांनी रेशमला तिची आईची जबाबदारी आणि मुलांबाबतचं कर्तव्य याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला.

या सगळ्यांना रेशम आपल्या बिनधास्त अंदाजात जोरदार प्रत्युत्तर दिलं. “माझी मुलं ही कायम माझी जबाबदारी असतील. मग ते ६ वर्षाचे असो, १८ वर्षाचे असो किंवा मग ३५ वर्षांचे. माझ्या लेकीला आणि मुलाला माझी गरजअसेन तेव्हा आई म्हणून मी कायम त्यांच्यासोबत उभी असेन” अशा शब्दांत रेशमने पालकत्वाची जबाबदारीची आठवण करून देणाऱ्यांना सुनावलंय. 


रेशमची लेक रिशिका मनमौजी आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेणारी असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.सोशल नेटवर्किंग साईटवरही रिशिका सक्रीय आहे.

रेशमचा पहिला पती संजीव सेठशी घटस्फोट झाला आहे. असं असलं तरी संजीव आणि त्याची दुसरी पत्नी लताशी रिशिकाचे चांगलेच संबंध आहेत.

रिशिका आणि लताचे फोटोही सोशल नेटवर्किंग साईटवर पाहायला मिळतात.


Web Title: Resham Tipnis daughter working in this field, see her photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.