हिंदी आणि मराठी सिनेमा तसेच मालिकांमध्ये आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री रेशम टिपणीस 'बिग बॉस' मराठी रिएलिटी शोमुळे चर्चेत आली. या शोमधील तिचा बोल्ड, बिनधास्त व फटकळ अंदाज प्रेक्षकांना आवडला होता. रेशम जीवनातील कुठलीगी खासगी गोष्ट असो किंवा मग भूमिका तिला जे आवडते ते करते. त्यामुळे तिचे चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आता रेशमने तिच्या आगामी प्रोजेक्ट इंस्टाग्रामवर सांगितला आहे.

रेशम टिपणीसने मुहूर्ताच्या क्लॅपसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, नव्या वर्षाची सुरूवात नव्या प्रोजेक्टने 'भाऊबळी'. 


रेशम टिपणीस भाऊबळी चित्रपटात कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप समजू शकलेलं नाही. जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या पुरस्कार विजेत्या कथासंग्रहातील ‘६७२ रूपयांचा सवाल, अर्थात युद्ध आमुचे सुरू...!’ या कथेवर आधारित 'भाऊबळी' हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर पाटील करत आहेत.


बिग बॉसच्या घरात रेशम टिपणीस व राजेश शृंगारपुरे नेहमी एकत्र असायचे आणि त्यांच्या वागण्यामुळे त्या दोघांच्या अफेयरची खूप चर्चा रंगली होती. मात्र रेशम बिग बॉसच्या घरात जाण्याच्या आधीपासून एका व्यक्तीला डेट करतेय. या व्यक्तीचं नाव आहे. संदेश किर्तीकर. रेशम व संदेश यांनी लग्न केलं नसलं तरी देखील त्यांच्या सोशल मीडियावर एकत्र फोटो पहायला मिळतात.

रेशमने वयाच्या २० व्या वर्षी संजीव सेठ या अभिनेत्यासोबत १९९३ मध्ये लग्न केलं. मात्र काही कारणामुळे तिने २००० साली घटस्फोट घेतला.

Web Title: Resham Tipnis is busy in shooting of Bhaubali Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.