This is the reason why Sakhee Gokhale to exit from Amar photo studio,whom she will miss most? | 'अमर फोटो स्टुडिओ' नाटकातला हा सदस्य घेणार एक्झिट, उच्चशिक्षणासाठी जाणार लंडनला!
'अमर फोटो स्टुडिओ' नाटकातला हा सदस्य घेणार एक्झिट, उच्चशिक्षणासाठी जाणार लंडनला!

रंगभूमीवर नाट्य रसिकांच्या पसंतीस पात्र ठरलेलं नाटक म्हणजे ‘अमर फोटो स्टुडिओ’. सर्वसामान्यांसह तरुणाईला नाट्यगृहाकडे आकर्षित करण्यात हे नाटक यशस्वी ठरलं. तरुणाईला भावणारं हे नाटक लवकरच अडीचशे प्रयोगांचा टप्पा पार करणार आहे. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, सिद्धेश पूरकर आणि पूजा ठोंबरे अशी तगडी स्टारकास्ट या नाटकातून रसिकांचं मनोरंजन करत आहे. मात्र या कलाकारांपैकी एक जण या नाटकाला अलविदा करणार आहे.मात्र हा कलाकार कोण असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. 

अखेर या नावावरुन पडदा उठला आहे. या नाटकात तनुची भूमिका साकारणारी अभिनेत्री सखी गोखले या नाटकातून एक्झिट घेणार आहे. सखी पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जाणार आहे. सखी या नाटकाचे पुढील पाच प्रयोग करणार आहे. यानंतर सखी पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना होईल. नाटकातून एक्झिट घेत असले तरी हे नाटक नावाप्रमाणे ‘अमर’ राहणार आहे असं सखीने म्हटले आहे. या नाटकातून नाइलाजाने बाहेर पडत असले तरी हे नाटक सुरु रहावं अशी इच्छा तिनं व्यक्त केली आहे. या नाटकाला आणि टीमला मिस करु अशी भावनिक प्रतिक्रिया तिने व्यक्त केली आहे. सखी या नाटकातून बाहेर पडत असताना तिची जागा कोण घेणार हे अद्याप समोर आलेले नाही. 

'दिल, दोस्ती, दुनियादारी' या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या सखीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय 'दिल दोस्ती दोबारा','रंग्रेज', 'तुकाराम' या सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. आपल्या यशाचे श्रेय सखी कायमच आपल्या पालकांना विशेषतः आपली आई शुभांगी गोखले यांना देते. तिने अनेकदा आपल्या आईचं आपल्या जीवनात किती मोलाचं स्थान आहे हे जाहीररित्या सांगितलं आहे.याचीच प्रचिती पुन्हा एकदा सोशल मीडियावर आली आहे.

एका नाट्य रसिकाकडे साखर खाल्लेला माणूस या नाटकाची दोन तिकीटे होती. या नाटकात प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले यांची प्रमुख भूमिका आहे. मात्र काही कामामुळे या नाट्य रसिकाला या नाटकाला जाणं शक्य नसल्याने तसं ट्विट त्याने केले. प्रशांत दामले आणि सखी गोखलेच्या आईची भूमिका असणा-या नाटकाची दोन तिकीटे आहेत. कुणाला हवी असल्यास संपर्क करणे असं ट्विट त्याने केले. याच ट्विटला सखीने उत्तर दिले आहे. या ट्विटमधील सखीची आई यावर तिने या नाट्य रसिकाला उत्तर दिले आहे. त्या अभिनेत्रीचे नाव शुभांगी गोखले आणि मी त्यांची मुलगी. कुणाला तिकीटं हवं असल्यास घ्या असं उत्तर तिने ट्विट करुन दिले आहे. 
 


Web Title: This is the reason why Sakhee Gokhale to exit from Amar photo studio,whom she will miss most?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.