रसिका सुनिलने शेअर केला HOT फोटो, सोशल मीडियावर घालतोय धुमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 10:36 AM2020-06-08T10:36:49+5:302020-06-08T10:37:10+5:30

रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Rasika Sunil shared HOT photo Viral On Social Media | रसिका सुनिलने शेअर केला HOT फोटो, सोशल मीडियावर घालतोय धुमाकुळ

रसिका सुनिलने शेअर केला HOT फोटो, सोशल मीडियावर घालतोय धुमाकुळ

googlenewsNext

'माझ्या नव-याची बायको' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. या मालिकेत तिने शनाया हे पात्र वठवले होते. पण काही दिवस ही भूमिका साकारल्यानंतर रसिकाने ही मालिका सोडली. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या नवीन फोटोंमुळे. 

काही महिन्यांपूर्वी रसिकाच्या सोशल मीडियावरील अशाच हॉट आणि सेक्सी फोटोंची खुमासदार चर्चा रंगली होती. या प्रत्येक फोटोमध्ये तिचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळाला होता. 

नेहमीच तिच्या  एकसे बढकर एक फोटोंना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळते.या फोटोशूटमध्ये तिच्या मादक अदा पाहून तिच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका निश्चितच चुकेल. रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बिकिनीतील फोटो शेअर केले होते.  तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. 

नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचा हा किलर लूक बघून नक्कीच तिचे चाहते घायाळ होतील. तिच्या सोशल मीडियापेजवर रसिकाने अशाप्रकारचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

रसिका उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. शिक्षणाबरोबरच विविध गोष्टी करण्यात ती बिझी होती. स्कुबा डाव्हींगचे रितसर प्रशिक्षण तिने घेतले होते.आता पुन्हा ती अभिनय क्षेत्रात कधी एंट्री करणार याकडेच तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Rasika Sunil shared HOT photo Viral On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.