Rampaat Teaser: रुपेरी पडद्यावर ‘रंपाट’ धम्माल, रवी जाधव यांचा आणखी एक नवा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 10:29 AM2019-03-05T10:29:56+5:302019-03-05T10:32:10+5:30

'रंपाट' चित्रपटाच्या टीजरमध्ये एकाही कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही.चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचे पाहायला मिळतंय. येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Rampaat Teaser: Another new movie of 'Rumpat Dhammal' and 'Ravi Jadhav' on Rupri Screen | Rampaat Teaser: रुपेरी पडद्यावर ‘रंपाट’ धम्माल, रवी जाधव यांचा आणखी एक नवा चित्रपट

Rampaat Teaser: रुपेरी पडद्यावर ‘रंपाट’ धम्माल, रवी जाधव यांचा आणखी एक नवा चित्रपट

googlenewsNext

रवी जाधव यांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची पर्वणीच .त्यामुळे त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आजवरील साऱ्याच चित्रपटांना रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. म्हणूनच काय त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांची रसिक आतुरतेने वाट पाहात असतात. आता रवी जाधव दिग्दर्शित आणखी एक चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'रंपाट' असे चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून रसिक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला आहे. 'बालक पालक' चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर पुन्हा एकदा रवी जाधव लहान मुलांचे भावविश्व रंपाट चित्रपटातून मांडणार आहे. मुलांचा त्यांच्या स्वप्नांशी होत असलेला पाठलाग दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे  टीजरमध्ये एकाही कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचे पाहायला मिळतंय. येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 
'बालक पालक' हा चित्रपट इतका हिट झाला की, तो फक्त तरुणांमध्येच नाही तर सर्वच वयोगटांतील रसिकांना आवडला होता. जिथे मराठी चित्रपटाला प्रेक्षकवर्ग मिळत नसल्याची ओरड करतो तिथे 'बालक पालक' चित्रपट मात्र अपवाद ठरला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाची तिकीटे ब्लॅकमध्येसुध्दा विकली गेली होती. असेच काहीशी भरघोस पसंती 'रंपाट' चित्रपटालाही मिळणार अशी आशा चित्रपटाच्या टीमला असणार हे मात्र नक्की.

Web Title: Rampaat Teaser: Another new movie of 'Rumpat Dhammal' and 'Ravi Jadhav' on Rupri Screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.