राजश्री प्रोडक्शने दिली अभिनय बेर्डेला ही खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2017 04:59 PM2017-01-05T16:59:03+5:302017-01-05T17:06:39+5:30

राजश्री प्रोडक्शनच्या मैंने प्यार किया, हम आपके है कौन यांसारख्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे लक्ष्मीकांत ...

Rajshri Productions has given a special gift to Bardella | राजश्री प्रोडक्शने दिली अभिनय बेर्डेला ही खास भेट

राजश्री प्रोडक्शने दिली अभिनय बेर्डेला ही खास भेट

googlenewsNext
जश्री प्रोडक्शनच्या मैंने प्यार किया, हम आपके है कौन यांसारख्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे लक्ष्मीकांत आणि राजश्री प्रोडक्शन यांचे खूप जवळचे नाते होते. लक्ष्मीकांत गेल्यानंतरही आज अनेक वर्षांनंतरही लक्ष्मीकांतच्या आठवणी राजश्री प्रोडक्शनच्या लोकांमध्ये ताज्या आहेत. 
लक्ष्मीकांतच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचा मुलगा अभिनय बेर्डे अभिनयक्षेत्रात उतरला आहे. ती सध्या काय करते या चित्रपटात तो प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. या चित्रपटासाठी राजश्री प्रोडक्शनने अभिनयला एक खास गिफ्ट दिले. 
कोणत्याही चित्रपटातील एखादे दृश्य जरी वापरायचे असेल तर त्या प्रोडक्शन हाऊसकडून परवानगी घ्यावी लागते. मैंने प्यार किया हा राजश्री प्रोडक्शनचा चित्रपट आहे. या चित्रपटातील एक दृश्य ती सध्या काय करते या चित्रपटात वापरण्यात आले आहे. सगळ्या सोसायटीतील मुले जमून अनुरागच्या म्हणजेच अभिनय बेर्डेच्या घरात मैंने प्यार किया हा चित्रपट पाहातात असे या चित्रपटात एक दृश्य आहे. या दृश्याच्या गरजेनुसार या दृश्यात मैंने प्यार किया हा चित्रपट दाखवणे गरजेचे होते. त्यामुळे ती सध्या काय करते या चित्रपटाचे निर्माते राजश्री प्रोडक्शनकडे याबाबत परवानगी मारण्यासाठी गेले होते. निर्माते भेटायला गेल्यानंतर राजश्रीच्या मंडळीने एका क्षणात चित्रपटात दृश्य वापरण्यासाठी परवानगी दिली. याचे कारण म्हणजे या चित्रपटात लक्ष्मीकांतचा मुलगा अभिनय प्रमुख भूमिकेत आहे.
कोणत्याही चित्रपटात आपल्या चित्रपटाचे दृश्य वापरण्यासाठी प्रोडक्शन हाऊस चांगलेच पैसे घेते. पण लक्ष्मीकांतमुळे राजश्रीने ती सध्या काय करतेच्या निर्मात्यांकडून एक रुपयादेखील घेतला नाही. राजश्रीने आपल्या लाडक्या लक्ष्मीकांतच्या मुलाला ही खास भेट दिली. 

Web Title: Rajshri Productions has given a special gift to Bardella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.