Priyanka Barve announces pregnancy as she shows off baby bump in a happy picture with hubby Sarang Kulkarni | प्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वेच्या घरी हलणार पाळणा, फोटो शेअर करत चाहत्यांसह शेअर केली GOOD NEWS

प्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वेच्या घरी हलणार पाळणा, फोटो शेअर करत चाहत्यांसह शेअर केली GOOD NEWS

कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या प्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वेच्या घरातून ऐकायला मिळत  आहेत. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बेबी बंम्प असलेला फोटो तिने सोशल मीडियावरही शेअर केला आहे. खुद्द प्रियंका बर्वेने चाहत्यांसह शेअर केले आहेत.

 

प्रियंका आणि सारंग  यांचे हे पहिले बाळ आहे. या फोटोंवर चाहत्यांनी  अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरूवात केलीय. संपूर्ण कुटुंबिय सध्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतोय. लग्नानंतर प्रियंका खाजगी आयुष्यात रमली. पती सारंग कुलकर्णीसह ती नेहमीच क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसली. दोघांमध्ये खूप घट्ट केमिस्ट्री आहे. सध्या दोघेही बाळाच्या येण्याची वाट पाहात आहेत.  दोघांचेही नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात. 

 

हाच आनंद त्यांच्या चेह-यावरही पाहायला मिळत आहेत. त्यांचे फोटो पाहून आयुष्यातील या महत्त्वपूर्ण टप्प्यात दे कपल  एन्जॉय करताना पाहायला मिळेल. दरोदरपणामुळे प्रियंकाच्या चेह-यावरी कमालीचा ग्लो आल्याचे पाहायला मिळते आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Priyanka Barve announces pregnancy as she shows off baby bump in a happy picture with hubby Sarang Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.