प्रिया बापटने शेअर केला विनामेकअप लूकमधील फोटो, अमृता खानविलकरच्या कमेंट वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 12:36 PM2021-02-15T12:36:55+5:302021-02-15T12:37:04+5:30

Amrita Khanwilkar comment on Priya Bapat photo : लवकरच ती एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

Priya Bapat shared a photo without makeup look, Amrita Khanwilkar said- Oh beauty | प्रिया बापटने शेअर केला विनामेकअप लूकमधील फोटो, अमृता खानविलकरच्या कमेंट वेधलं लक्ष

प्रिया बापटने शेअर केला विनामेकअप लूकमधील फोटो, अमृता खानविलकरच्या कमेंट वेधलं लक्ष

googlenewsNext

उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे. करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळे तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. नव्या वर्षात ती नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. प्रियाने इन्स्टाग्रामवर तिचा विनामेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे. विना मेकअप लूकमध्ये ही प्रिया तितकीच छान दिसतेय. प्रियाचा हे फोटो तिच्या फॅन्सनासह सेलिब्रेटींनादेखील आवडले आहे. अमृता खानविलकरने प्रियाच्या फोटोवर ओहो, ब्युटी अशी कमेंट केली आहे. 


लवकरच ती एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचे नाव फादर लाइक असे आहे. सिंगापूरमध्ये याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक आहे. याशिवाय 'प्रिया सिटी ऑफ ड्रीम्स'च्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील झळकणार आहे.. 

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती.

Web Title: Priya Bapat shared a photo without makeup look, Amrita Khanwilkar said- Oh beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.