प्रार्थना बेहरे ऑफ व्हाइट रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली थिरकताना, पहा तिचा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 05:17 PM2021-03-03T17:17:57+5:302021-03-03T17:18:26+5:30

अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने ऑफ व्हाइट रंगाच्या ड्रेसमधील व्हिडीओ शेअर केला आहे.

Prathana Behere shared video in Off white dress | प्रार्थना बेहरे ऑफ व्हाइट रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली थिरकताना, पहा तिचा हा व्हिडीओ

प्रार्थना बेहरे ऑफ व्हाइट रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली थिरकताना, पहा तिचा हा व्हिडीओ

googlenewsNext

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. नुकतेच प्रार्थनाने तिचे ऑफ व्हाईट रंगाच्या ड्रेसमधले फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटसोबत तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप भावतो आहे.


अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने ऑफ व्हाइट रंगाच्या ड्रेसमधील व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, असे कपडे निवडा जे तुम्हाला आनंदी ठेवतील. 

या व्हिडीओत प्रार्थना खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेय. प्रार्थनाचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप भावला आहे. या ड्रेसमध्ये ती नाचताना दिसते आहे.

प्रार्थना बेहरेने काही महिन्यांपूर्वी लंडनमध्ये छूमंतर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तिथे शूटिंग करतानाचे फोटो आणि व्हिडीओ कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.


छूमंतर शिवाय प्रार्थना एका हिंदी वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे. प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. याआधी तिने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात तिने काम केलं आहे.

Web Title: Prathana Behere shared video in Off white dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.