प्रथमेश परब आणि निखिल चव्हाणच्या ‘डार्लिंग’चा धडाकेबाज ट्रेलर भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 05:51 PM2020-12-21T17:51:46+5:302020-12-21T17:52:15+5:30

प्रथमेश परब आणि निखिल चव्हाणच्या ‘डार्लिंग’ सिनेमाच्या ट्रेलरला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

Prathamesh Parab and Nikhil Chavan's smash hit 'Darling' trailer out | प्रथमेश परब आणि निखिल चव्हाणच्या ‘डार्लिंग’चा धडाकेबाज ट्रेलर भेटीला

प्रथमेश परब आणि निखिल चव्हाणच्या ‘डार्लिंग’चा धडाकेबाज ट्रेलर भेटीला

googlenewsNext

टाइमपास फेम अभिनेता प्रथमेश परब आणि लागिर झालं जी फेम निखिल चव्हाण यांचा आगामी चित्रपट डार्लिंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   
‘‘डार्लिंग तू...’’ या टायटल साँगने प्रेक्षकांची तूफान दाद मिळवल्यानंतर सध्या ‘डार्लिंग’मधील ‘‘ये है प्यार...’’ हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होत आहे. अशा वातावरणात ‘डार्लिंग’चा धडाकेबाज ट्रेलर भेटीला आला आहे. 


  7 हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत ‘डार्लिंग’ची निर्मिती अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही.  जे. शलाका आणि निखील खजिनदार यांनी केली आहे. आजवर नेहमीच वेगळ्या वाटेने जात रसिकांना काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न करणा-या दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या नजरेतून ‘डार्लिंग’ची प्रेमकथा पहायला मिळणार आहे. उत्सुकता वाढवणाऱ्या कथानकाला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देत, सुरेल गीत-संगीताची पेरणी आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांचा यथोचित वापर करून हा सिनेमा बनवण्यात आला आहे. अबालवृद्धांचा लाडका अभिनेता प्रथमेश परब आणि रितीका श्रोत्री ही ‘टकाटक’ जोडी पुन्हा एकदा या सिनेमात लक्ष वेधून घेणार असून त्यांच्या जोडीला ‘लागिरं झालं जी’फेम निखिल चव्हाणही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 


एका वेगळ्याच वाटेवरील तसंच आजवर कधीही समोर न आलेले विविध पैलू उलगडणारी प्रेमकथा या सिनेमात आहे.‘डार्लिंग’चं लेखन समीर आशा पाटील यांनी केलं असून या सिनेमात प्रथमेश परब, रितीका श्रोत्री, निखिल चव्हाण, मंगेश कदम, आनंद इंगळे इ. कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चिनार-महेश या आजच्या काळातील आघाडीच्या संगीतकार जोडीनं चित्रपटातील गीते संगीतबद्ध केली आहेत.

Web Title: Prathamesh Parab and Nikhil Chavan's smash hit 'Darling' trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.