प्रसाद ओकने केला मराठी राजभाषा व्हिडीओ आॅनलाईन प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2017 09:48 AM2017-02-26T09:48:43+5:302017-02-26T15:18:43+5:30

सगळं जग आता डिजिटल झालं आहे असं आपण सहजच बोलून जातो. परंतु याच डिजिटल विश्वात सहभागी होऊन आपल्या संस्कृतीचा, ...

Prasad Okane performed Marathi Official Language Video Online | प्रसाद ओकने केला मराठी राजभाषा व्हिडीओ आॅनलाईन प्रदर्शित

प्रसाद ओकने केला मराठी राजभाषा व्हिडीओ आॅनलाईन प्रदर्शित

googlenewsNext
ळं जग आता डिजिटल झालं आहे असं आपण सहजच बोलून जातो. परंतु याच डिजिटल विश्वात सहभागी होऊन आपल्या संस्कृतीचा, आपल्या परिसराचा किती सहभाग करतो हा वैचारिक प्रश्न आहे. परंतु कॅफेमराठीने धाडसी पाऊल उचलले आहे. कॅफेमराठी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरु झालेल्या वर्ल्ड फेमस इन महाराष्ट्र या सिरीजच्या पहिल्याच छत्रपती शिवाजी महाराज या व्हिडीओला पहिल्याच दिवशी एक लाखांपेक्षा अधिक लोकांनी पसंती दिली आहे. याच सिरीजचा मराठी राजभाषा हा दुसरा एपिसोड अभिनेता प्रसाद ओक यांने आॅनलाईन प्रदर्शित केला आहे. 
   
       या व्हिडीओविषयी प्रसाद ओक सांगतो की, अभिनेता चिन्मय मांडलेकर यांच्या आवाजातील मराठी भाषेची महती सांगणारा हा व्हिडीओ म्हणजे मराठी भाषिकाचा मानबिंदू ठरणार आहे. मराठी भाषेची उत्पत्ती, मराठी भाषेची सर्वांगीन माहिती आणि बरंच काही तेही एका वेगळ्याच पद्धतीने या व्हिडीओ मधून दाखवण्यात आले आहे. यासाठी मी टीम कॅफेमराठीचे मनापासून कौतुक करतो आणि पुढे त्यांनी असेच चांगले दर्जेदार  व्हिडीओ बनवत रहावे यासाठी त्यांना शुभेच्छा देतो.
     
         महाराष्ट्रातील अशी प्रत्येक गोष्ट जी वर्ल्ड फेमस आहे, आणि ज्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे अशा सर्व गोष्टींचा या व्हिडीओ मध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचा कंटेंट देणारा कॅफेमराठी हा पहिलाच डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, अशी माहिती कॅफेमराठीचे निमार्ते भूपेंद्रकुमार नंदन आणि निखील रायबोले यांनी दिली आहे. हा व्हिडीओदेखील नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. 

{{{{twitter_post_id####}}}}

   

Web Title: Prasad Okane performed Marathi Official Language Video Online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.