हा अभिनेता पुन्हा एकदा वळला दिग्दर्शनाकडे, पहिल्या सिनेमासाठी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 04:36 PM2019-08-30T16:36:11+5:302019-08-30T16:40:02+5:30

कच्चा लिंबू या त्याच्या पहिल्याच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर हा अभिनेता पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळला आहे.

Prasad oak directed hirkani marathi movie poster out | हा अभिनेता पुन्हा एकदा वळला दिग्दर्शनाकडे, पहिल्या सिनेमासाठी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

हा अभिनेता पुन्हा एकदा वळला दिग्दर्शनाकडे, पहिल्या सिनेमासाठी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

googlenewsNext

कच्चा लिंबू या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर उत्सुकता आहे ती प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकरणी या चित्रपटाची. या चित्रपटाचं अत्यंत उत्कंठावर्धक असं मोशन पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसाद ओक आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त राजेश मापुसकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. 


इरादा एंटरटेन्मेंटच्या फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लॉरेन्स डिसुझा सहनिर्माते आहेत. तर राजेश मापुसकर यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी निभावली आहे. स्वरूप एंटरटेनमेंटचे आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार हे या चित्रपटासाठी  मार्केटिंगचे काम पाहत आहेत.

चित्रपटात कलाकार कोण आहेत हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. "प्रत्येक आई असतेच... हिरकणी" ही टॅगलाईनही आकर्षक आहे. मुलासाठी अतिशय मोठं धाडस केलेल्या आईची ऐतिहासिक गोष्ट चित्रपटात मांडण्यात आल्याचं आपल्याला मोशन पोस्टरवरून कळतं. गडाच्या बुरुजावर उभे असलेल्या छत्रपती शिवरायांपासून ते खांद्यावर बाळ घेऊन उभी असलेली हिरकणी आपल्याला पोस्टरमध्ये दिसते. चित्रपटाचं मोशन पोस्टर अतिशय उत्कंठावर्धक आहे. त्यामुळे हा चित्रपटही प्रेक्षकांसाठी एक खास अनुभव ठरेल यात शंका नाही. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे
 

Web Title: Prasad oak directed hirkani marathi movie poster out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.