प्रार्थना बेहरेने केले ट्रेडिशनल फोटोशूट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 12:58 PM2020-01-04T12:58:42+5:302020-01-04T13:05:04+5:30

अभिनेत्री प्रार्थनाची एक वेगळी स्टाईल आहे.

Prarthana behere share new photoshoot on social media | प्रार्थना बेहरेने केले ट्रेडिशनल फोटोशूट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ..

प्रार्थना बेहरेने केले ट्रेडिशनल फोटोशूट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ..

googlenewsNext

प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. अभिनेत्री प्रार्थनाची एक वेगळी स्टाईल आहे. तिच्या इन्स्टावर नजर टाकली तर तुम्हाला कळेल की अमुकएक फॅशन तिने कधीच फॉलो केलेली नाही. प्रार्थना नुकतेच ट्रेडिशनल लूकमधले फोटोशूट शेअर केले आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. प्रार्थनच्या फॅन्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  


कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.


प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.

प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे.

Web Title: Prarthana behere share new photoshoot on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.