प्रार्थना बेहरे आहे खूपच चांगली पेंटर, तिचे हे पेंटिग पाहून म्हणाल व्वा क्या बात है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:29 PM2021-04-27T12:29:22+5:302021-04-27T12:30:31+5:30

प्रार्थनाचा हा व्हिडिओ क्षणात व्हायरल झाला असून केवळ एका तासात 86 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सामान्य लोकांनीच नव्हे तर सेलिब्रेटींनी देखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

prarthana behere is good painter, check this painting | प्रार्थना बेहरे आहे खूपच चांगली पेंटर, तिचे हे पेंटिग पाहून म्हणाल व्वा क्या बात है

प्रार्थना बेहरे आहे खूपच चांगली पेंटर, तिचे हे पेंटिग पाहून म्हणाल व्वा क्या बात है

googlenewsNext
ठळक मुद्देसुयश टिळक, ऋतुजा बागवे, सोनाली कुलकर्णी, मयुरी देेशमुख यांसारख्या सेलिब्रेटींनी तिचे हे पेंटिंग खूप चांगले असल्याचे सोशल मीडियाद्वारे तिला सांगितले आहे.

प्रार्थना बेहरे ही खूप चांगली अभिनेत्री आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण त्याचसोबत तिच्यात एक खूप चांगली कला आहे. प्रार्थना खूपच चांगले पेंटिंग करते. तिचा पेंटिंग करतानाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

प्रार्थनाचा हा व्हिडिओ क्षणात व्हायरल झाला असून केवळ एका तासात 86 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सामान्य लोकांनीच नव्हे तर सेलिब्रेटींनी देखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे. सुयश टिळक, ऋतुजा बागवे, सोनाली कुलकर्णी, मयुरी देेशमुख यांसारख्या सेलिब्रेटींनी तिचे हे पेंटिंग खूप चांगले असल्याचे सोशल मीडियाद्वारे तिला सांगितले आहे. 

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्याचबरोबर ती एका हिंदी वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे. प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.

Web Title: prarthana behere is good painter, check this painting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.