या अभिनेत्रीने केला महिला दिनाच्या निमित्ताने कष्टकरी रणरागिनी महिलांना सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 03:54 PM2021-03-08T15:54:56+5:302021-03-08T15:55:59+5:30

या अभिनेत्रीने कष्टकरी रणरागिनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Prarthana Behere gives women day wishes in different style | या अभिनेत्रीने केला महिला दिनाच्या निमित्ताने कष्टकरी रणरागिनी महिलांना सलाम

या अभिनेत्रीने केला महिला दिनाच्या निमित्ताने कष्टकरी रणरागिनी महिलांना सलाम

googlenewsNext
ठळक मुद्देप्रार्थनाने कष्टकरी महिलांप्रमाणे स्वतःचा लूक करत शुभेच्छा दिल्या आहेत. पहिल्या फोटोत तिने डोक्यावर ओझे वाहणाऱ्या महिलेसारखा लूक केला असून या लूकमधील तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला दिनाच्या शुभेच्छा जगातील सगळ्या महिलांना देत आहेत. यात प्रार्थना बेहरेने कष्टकरी रणरागिनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

प्रार्थनाने कष्टकरी महिलांप्रमाणे स्वतःचा लूक करत शुभेच्छा दिल्या आहेत. पहिल्या फोटोत तिने डोक्यावर ओझे वाहणाऱ्या महिलेसारखा लूक केला असून या लूकमधील तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टसोबत तिने लिहिले आहे की, जागतिक महिलादिनी आम्हाला त्या कणखर आणि खंबीर महिलांना सलाम करावासा वाटतो ज्या आपल्या कष्टाने रोज घाम गाळून छोट्या प्रमाणावर का होईना देशाच्या आर्थिक उन्नतीतमध्ये भर घालतात आणि नेटाने आपले घर आणि देश चालवतात अशा सर्व कष्टकरी रणरागिनी महिलांना माझा सलाम...

प्रार्थनाने आणखी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोत तिने मासेविक्री करणाऱ्या महिलेप्रमाणे लूक केला असून ती मासे विकताना दिसत आहे. तिने विविध लूकद्वारे विविध काम करणाऱ्या महिलांना सलाम केला आहे. 

प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे.यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे.

त्याचबरोबर ती एका हिंदी बेवसीरिजमध्ये देखील दिसणार आहे. प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली.'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.

Web Title: Prarthana Behere gives women day wishes in different style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.