प्राजक्ता माळीच्या सोज्वळ लूकनं चाहत्यानं केलं घायाळ, पहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 06:30 AM2019-11-30T06:30:00+5:302019-11-30T06:30:00+5:30

प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर ट्रेडिशनल गेटअपमधील फोटो शेअर केला आहे.

Prajakta Mali shared photos on instagram, see her photos | प्राजक्ता माळीच्या सोज्वळ लूकनं चाहत्यानं केलं घायाळ, पहा तिचे हे फोटो

प्राजक्ता माळीच्या सोज्वळ लूकनं चाहत्यानं केलं घायाळ, पहा तिचे हे फोटो

googlenewsNext

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 

प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. आपल्या पर्सनल लाईफ आणि तसेच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात.

 
नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच सोज्वळ दिसते आहे. ती ट्रेडिशनल लूकमध्ये दिसते आहे. फोटो शेअर करून प्राजक्तानं म्हटले की, पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती, ही नजर उधळते काळजातली पिरती...

प्राजक्ताच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.

प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ता माळीला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.


 

Web Title: Prajakta Mali shared photos on instagram, see her photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.