Prajakta mali and suvrat joshi movie dokyala shot release on 1st march | प्राजक्ता माळी आणि सुव्रत जोशीचा 'डोक्याला शॉट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
प्राजक्ता माळी आणि सुव्रत जोशीचा 'डोक्याला शॉट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ठळक मुद्दे 'डोक्याला शॉट' येत्या १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे

विषयाची अचूक निवड आणि प्रेक्षकांची नाळ अचूक ओळखून, मराठी सिनेसृष्टीला सुपरहीट चित्रपट देणारा तरुण निर्माता उत्तुंग हितेंद्र ठाकूर. 'अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन'च्या माध्यमातून त्याने आतापर्यंत 'बालक पालक', 'यल्लो' यांसारखे संवेदनशील विषय असलेले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहेत. 'बालक पालक' या चित्रपटाला प्रेक्षकांची लोकप्रियता मिळाली तर 'यल्लो' चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला. उत्तुंगची निर्मिती असलेला तिसरा चित्रपटही आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित 'डोक्याला शॉट' हा चित्रपटही मनोरंजनाने परिपूर्ण असणार, यात शंकाच नाही. विशेष म्हणजे उत्तुंगने या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा तर सांभाळली आहेच, शिवाय त्याने या चित्रपटातील एका धमाकेदार गाण्यात आपले नृत्यकौशल्यही दाखवले आहे. परदेशात चित्रपट निर्मितीचे धडे घेणाऱ्या उत्तुंगने एखाद्या चौकटीत अडकून न राहता नेहमीच वैविध्यपूर्ण विषय हाताळून, प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला. अर्थात या प्रवासात त्याला अभिनेता रितेश देशमुख याची मोलाची साथ लाभली असल्याचेही उत्तुंग प्रांजळपणे मान्य करतो. तर आपण मराठी चित्रपटसृष्टीत उत्तुंगमुळेच आल्याचे यापूर्वी अनेकदा रितेशनेही कबूल केले आहे. 


 या वर्षात उत्तुंग प्रेक्षकांसाठी आणखी दोन दर्जेदार चित्रपट घेऊन येणार आहे. त्यामुळे या वर्षात प्रेक्षकांना काही नाविन्यपूर्ण पाहायला मिळणार, हे नक्की. तोपर्यंत प्रेक्षकांसाठी 'डोक्याला शॉट' आहेच. येत्या १ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन आणि गणेश पंडित यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


Web Title: Prajakta mali and suvrat joshi movie dokyala shot release on 1st march
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.