हिंदी गाण्यात थिरकणार पूजा सावंत, लवकरच रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 12:08 PM2021-11-16T12:08:19+5:302021-11-16T12:15:35+5:30

. 'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यानंतर 'आता गं बया', 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'नीळकंठ मास्तर' अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Pooja Sawant First Hindi Song Released Soon | हिंदी गाण्यात थिरकणार पूजा सावंत, लवकरच रसिकांच्या भेटीला

हिंदी गाण्यात थिरकणार पूजा सावंत, लवकरच रसिकांच्या भेटीला

googlenewsNext

आपल्या अभिनयाने तसंच सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री पूजा सावंत. पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यानंतर 'आता गं बया', 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'नीळकंठ मास्तर' अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मराठी रसिकांची मनं जिकंल्यानंतर ती थेट बॉलिवूडमध्ये तिने एंट्री केली होती. 

'जंगली' हा पूजाचा पहिला हिंदी सिनेमा होता. अभिनेता विद्युत जामवालसोबत ती 'जंगली' सिनेमात झळकली होती. 'जंगली' हा एका वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्यावरील सिनेमा होता. आता पुन्हा एकदा पूजा सावंत रसिकांच्या भेटीला येणार आहे. पूजा सावंत आता हिंदी गाण्यातही आपल्या जलव्यांना रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. हे गाणे हिंदी असले तरी या गाण्यांमध्ये प्राधान्य मराठी कलाकारांना संधी देण्यात आली आहे. 

सोशल मीडियावर पूजा सावंत नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. पूजा आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.चाहत्यांनाही तिचा प्रत्येक अंदाज पसंतीस पात्र ठरतो. तिचा ट्रेडिनशनल असो किंवा वेस्टर्न तिचा अंदाजावर चाहत्यांच्या नजरा खिळतात. सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री आहे. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांच्या संख्येतही भर पडत असते. 

Web Title: Pooja Sawant First Hindi Song Released Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.