‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमांतून दिसलेली ग्लॅमरस अभिनेत्री पल्लवी पाटीलने  ‘गोंद्या आला रे’च्या माध्यमातून वेबसीरिजच्या दुनियेतदेखील पदार्पण केले आहे. पल्लवी पाटीलने  ‘गोंद्या आला रे’ वेबसीरिजमध्ये दामोदर चापेकरांची पत्नी ‘दुर्गाबाई चापेकर’ या शूर महिलेची भूमिका साकारली होती. 


अभिनेत्री पल्लवी  सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नुकताच पल्लवीने तिचा साडीतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ऑरेंज रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुललं आहे. पल्लवीचे हे फोटो तिच्या फॅन्सना देखील आवडले आहेत. 


लवकरच पल्लवी अंकुश चौधरी, शिवानी सुर्वेसोबत ट्रिपल सीट सिनेमात दिसणार आहे. वायरलेस प्रेमाची गोष्ट’ अशी टॅगलाईन असल्याने हा चित्रपट एक रोमँटिक कथानक घेऊन येत असल्याचे दिसतेय.

सध्या पल्लवी या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.  येत्या २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर पल्लवीच्या फॅन्स एक स्पेशल ट्रिट मिळणार आहे. 


Web Title: Pallavi patil looks beautiful in saree, see pics
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.