लॉकडाऊनमध्ये चेहऱ्यावर मास्क लावत मराठी अभिनेत्रीने दिला महत्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 01:50 PM2020-04-14T13:50:25+5:302020-04-14T14:02:27+5:30

देशात लागू असलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.

pallavi patil give important suggestion to her fans for the lockdown period gda | लॉकडाऊनमध्ये चेहऱ्यावर मास्क लावत मराठी अभिनेत्रीने दिला महत्वाचा सल्ला

लॉकडाऊनमध्ये चेहऱ्यावर मास्क लावत मराठी अभिनेत्रीने दिला महत्वाचा सल्ला

googlenewsNext

देशात लागू असलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा मोदींनी केली. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य ते कलाकार सध्या घरातच आहेत. अभिनेत्री पल्लवी पाटील हिने चेहऱ्यावर मास्क लावलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना पल्लवी म्हणतेय, मला आशा आहे तुम्ही सगळे सुरक्षित आहात. तुम्ही तुमच्या कुटुबांची आणि स्वत:ची काळजी घेता आहे. कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. घराबाहेर पडताना चेहऱ्याला मास्क लावायचा विसरु नका. अशा आशयाचे कॅप्शन पल्लवीने या फोटोला दिले आहे.  


अभिनेत्री पल्लवी पाटील सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससाठी शेअर करत असते. 'क्लासमेटस्’, 'शेंटीमेंटल', 'सविता दामोदर परांजपे', 'बॉइज-2', 'तू तिथे असावे' अशा सिनेमात पल्लवी पाटीलने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या असून ‘गोंद्या आला रे’च्या माध्यमातून तिने काही महिन्यांपूर्वी वेबसीरिजच्या दुनियेतदेखील पदार्पण केले आहे. पल्लवी पाटीलने ‘गोंद्या आला रे’ वेबसीरिजमध्ये दामोदर चापेकरांची पत्नी ‘दुर्गाबाई चापेकर’ या शूर महिलेची भूमिका साकारली होती.

Web Title: pallavi patil give important suggestion to her fans for the lockdown period gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.