ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव पहिल्यांदा झळकणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 11:43 AM2019-07-13T11:43:44+5:302019-07-13T11:47:01+5:30

प्रेमाची एक नवीन ओळख करून द्यायला लवकरच येत आहे एक नवीन वेबसिरीज 'यु टर्न' रसिकांच्या भेटीला येत आहे .

 Om Prakash Shinde and Sayali Sanjeev together for the first time In New Websereis U-Turn | ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव पहिल्यांदा झळकणार एकत्र

ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव पहिल्यांदा झळकणार एकत्र

googlenewsNext

प्रेम म्हणजे समजली तर भावना ठेवला तर विश्वास मांडला तर खेळ आणि निभावलं तर वचन. याच प्रेमाची एक नवीन ओळख करून द्यायला लवकरच येत आहे एक नवीन वेबसिरीज 'यु टर्न' रसिकांच्या भेटीला येत आहे . 'यु टर्न' म्हटले की पटकन डोळ्यांसमोर येतो गाडीतून फिरताना मारला जाणारा 'यु टर्न'. हा 'यु टर्न' मात्र जरा वेगळा आहे. या वेबसिरीजमध्ये अनेक गाजलेल्या मालिकांमधून दिसणारे दोन चेहरे आपल्याला दिसणार आहेत. 
ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव ही नवीकोरी जोडी आपल्याला या वेबसिरीजच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. तूर्तास या वेबसिरीजचा एक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. तीस सेकंदाच्या या व्हिडिओत ओमप्रकाश आणि सायली दिसत असून दोघेही एकमेकांसोबत अतिशय आनंदी दिसत आहेत. या वेबसिरीजमध्ये काय पाहायला मिळणार यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे. 

सायली संजीव ही काहे दिया परदेसमध्ये झळकली होती. पहिल्याच मालिकेतून तिने रसिकांची पंसती मिळवली होती. मालिकेत तिने साकारलेली गौरी या भूमिकेला तर रसिकांनी अक्षरक्षः डोक्यावर घेतलं होतं. मालिका बंद झाल्यानंतर सायली हिंदी मालिकेकडे वळली.'परफेक्ट पति' या मालिकेतून हिंदी रसिकांचीही मनं जिंकली. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत आहे. हीच पॉप्युलारिटी इनकॅश करण्यासाठी निर्मात्यांनी सायली संजीवची या वेबसिरीजसाठी निवड केली आहे. 

तसेच सायलीसह ओमप्रकाश शिंदे ही आपल्याला अनोख्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. ओमप्रकाशने  'खुलता कळी खुलेना', 'का रे दुरावा' आणि 'लक्ष्मी सदैव मंगलम' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. आत पहिल्यांदा सायली आणि ओमप्रकाश एकत्र वेबसिरीजमध्ये झळकणार म्हटल्यावर त्यांची ही जोडी रसिकांना कितपत पसंतीस पात्र ठरते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Web Title:  Om Prakash Shinde and Sayali Sanjeev together for the first time In New Websereis U-Turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.