झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एक अतूट नाते तयार झाले आहे. मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी.चे उच्चांक गाठत आहे. या मालिकेमधील विकिशाचे म्हणजेच विक्रांत आणि इशा यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती. सर्व प्रेक्षकांना ज्या लग्नाचे वेध लागले होते तो नवीन वर्षातील पहिलाच शाही लग्नसोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला. निमकरांची इशा सरंजामेंच्या मोठ्या घरात लग्न करून आली आणि रुळली देखील. लग्नानंतर इशा आणि विक्रांतची लग्नानंतरची आता पहिली होळी असणार आहे.

 हा होळीचा उत्सव प्रेक्षक मालिकेत पाहू शकणार आहेत. त्याशिवाय या मालिकेतील कलाकारांनीदेखील ऑफस्क्रीन होळीदेखील साजरी केली आहे.

यात कलाकार रंगाने रंगलेले दिसत आहेत.


मालिकेत बेडेकर चाळीत रंगपंचमी अगदी उत्साहात साजरी करतात आणि हा सण बेडेकर चाळीत साजरा करण्यासाठी इशाचे आई बाबा सरंजामे कुटुंबियांना आग्रहाचे निमंत्रण द्यायला येतात. ते निमंत्रण स्वीकारून सरंजामे कुटुंबिय बेडेकर चाळीत होळी साजरी करणार आहेत.


विक्रांत आणि इशाची हि पहिलीच होळी असून हा सण त्यांच्या आयुष्यात किती रंग आणणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहता येणार आहे.


Web Title: Offscreen Holi Celebration Tula Pahate Re, See Photos
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.