अभिनेता स्वप्नील जोशीसोबत आता तुम्हाला संवाद साधणे सोप्पे झाले आहे. आता कसे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना... स्वप्निल जोशीचे नुकतेच मोबाईल अ‍ॅप्लिकेशन लाँच करण्यात आले आहे. सप्राया टेक्नॉलॉजीने किंशिपहब या त्यांच्या फ्लॅगशीप प्रोडक्ट अंतर्गत स्वप्निल जोशीचे हे वैयक्तिकृत अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे.


सिलेब्रिटीजच्या आयुष्यात पडद्यामागे काय चालले आहे याचे सगळ्याच फॅन्सना कुतूहल असते आणि त्यांच्याशी थेट संवाद साधता यावा अशी इच्छाही असते. फॅन्सची हीच इच्छा ओळखून किंशीपहबचे कार्यकारी अधिकारी वासुदेव महांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.


या अ‍ॅप्लिकेशचे वैशिष्ट्य म्हणजे इथे फॅन्सना कोणत्याही प्रकारची वाट न पाहता किंवा त्रास न घेता स्वप्निल जोशीच्या आयुष्यात डोकावता येणार आहे. फॅन्सना त्यांच्या मनातले प्रश्न, त्यांचे फीडबॅक्स इतकेच नाही तर एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रणही स्वप्निलला एका क्लिकवर पाठवता येणार आहे.


हे अ‍ॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वर उपलब्ध असून युजर्स हे अ‍ॅप्लिकेशन सहज डाउनलोड करू शकतात. अँड्रॉईड युजर्ससाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.kinshiphub.swapnilj&hl=en आणि आयओएस युजर्ससाठी https://itunes.apple.com/in/app/swapnil-joshi-app/id1439335002?mt=8 ही लिंक देण्यात आली आहे.
स्वप्नील जोशीचा ‘मोगरा फुलला’हा चित्रपट येत्या १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी सोबत चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, नीना कुळकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.


तसेच स्वप्नील जोशीची जिवलगा ही मालिकादेखील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.


Web Title: Now, Swapnil Joshi is going to interact with fans
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.