'सैराट'मधील आर्ची उर्फ रिंकू राजगुरू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. 


नुकताच रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती चांगली दिसते आहे. तिने या फोटोला कॅप्शन देत म्हटलंय की, 'एखादी उणीव कॅरेक्टर तयार करते. '

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग,तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. 


'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आता तर रिंकूचा चांगलाच मेकओव्हर झाला असून स्टायलिश रिंकू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

आता तिचा मेकअप हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
 


Web Title: No Colorful ... Black and White Photo also shows Archie aka Rinku Rajguru Beautiful
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.