निखिल चव्हाण व सायली पाटील यांच्या 'धोंडी चंप्या' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 07:25 PM2019-04-02T19:25:00+5:302019-04-02T19:25:00+5:30

निखिल चव्हाण 'धोंडी चंप्या' चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि हा एक रोमँटिक विनोदी चित्रपट आहे.

Nikhil Chavan and Sayli Patil's 'Dhondi Champya' movie | निखिल चव्हाण व सायली पाटील यांच्या 'धोंडी चंप्या' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

निखिल चव्हाण व सायली पाटील यांच्या 'धोंडी चंप्या' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

googlenewsNext

'लागीर झालं जी' या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता निखिल चव्हाण लवकरच प्रियकराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'धोंडी चंप्या' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि त्याच्यासोबत दिसणार आहे 'बॉईज २' फेम सायली पाटील. निखिल चव्हाण व सायली पाटील ही जोडी यापूर्वी 'स्त्रीलिंग-पुल्लिंग' चित्रपटात पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता हे दोघे ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित 'धोंडी चंप्या' या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. ही माहिती खुद्द निखिलने सोशल मीडियावर दिली आहे.

निखिल चव्हाणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर क्लॅपचा फोटो शेअर करीत लिहिले की,' नवीन सिनेमा... नवीन लोक...नवीन सुरूवात.... प्रवासाला सुरूवात.'

निखिल चव्हाण 'धोंडी चंप्या' चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि हा एक रोमँटिक विनोदी चित्रपट आहे. ज्ञानेश भालेकरांनी 'धोंडी चंप्या'चे दिग्दर्शन केले आहे. 'धोंडी चंप्या'ची प्रेमकथा म्हणजे एका म्हैस आणि रेड्याच्या अनुषंगानने उलगडत जाते. एका गावातील बागायतदार उमाजी आणि अंकुश यांच्यात चालत आलेल्या परंपरागत वैराला धोंडी आणि चंप्या बळी पडतात. उमाजी म्हणजेच भरत जाधव आणि अंकुश म्हणजेच वैभव मांगले यांच्या मुलांच्या भूमिकेत निखिल आणि सायली दिसणार आहेत. वडीलांप्रमाणे भांडता भांडता निखिल आणि सायली एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि प्रेमाचा लपंडाव सुरू होतो. धोंडी आणि चंप्याची प्रेमकथा यशस्वी होते की नाही हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

निखिल व सायली यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. 'धोंडी आणि चंप्या'ची ही लव्हेबल कॉमेडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Nikhil Chavan and Sayli Patil's 'Dhondi Champya' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.