अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते.   सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.


२०१३ साली 'टाईम प्लिज' सिनेमात उमेश आणि प्रिया ही गोड जोडी एकत्र झळकली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र  झळकले नाहीत. त्यामुळे हे दोघेही कधी ऑनस्क्रीन पाहायला मिळणार याचीच चाहते आतुरतेने वाट पाहात होते. आणि अखेर चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार असेच प्रियाच्या पोस्टमधून समजतंय.

तुर्तास ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच फॅन्सकडून आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सहकाऱ्यांकडून दोघांवर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. 

काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. नागेश कुकुनूर यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या वेब सीरिजमध्ये काही बोल्ड सीन्स प्रियाने दिले आहेत. 


'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे  प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले.


 


Web Title: New photoshoot of Priya Bapat, looks like dashing and glamorous, See Photos
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.