बँकॉकमध्ये शूट करतेय ही मराठी अभिनेत्री, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 11:13 AM2019-10-17T11:13:53+5:302019-10-17T11:19:10+5:30

मराठी इंडस्ट्रीत सगळ्यात बोल्ड अभिनेत्री अशी तिची ओळख आहे.

Neha mahajan doing shooting in bangkok | बँकॉकमध्ये शूट करतेय ही मराठी अभिनेत्री, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत

बँकॉकमध्ये शूट करतेय ही मराठी अभिनेत्री, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत

googlenewsNext

मराठी इंडस्ट्रीत नेहा महाजनला सगळ्यात बोल्ड अभिनेत्री समजले जाते. सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असून ती तिच्या प्रोजेक्टविषयी माहिती आणि तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. बोल्ड, हॉट आणि सेक्सी असलेली ही अभिनेत्री तितकीच हुशारही आहे. नेहा ही फिटनेस फ्रिकही आहे. नित्यनियमाने ती योगा करत असल्याचे पाहायला मिळते. ती तिच्या फिटनेसच्या दिनचर्येकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. 


खरंतर नेहाने 'कॉफी आणि बरचं काही', 'वन वे तिकीट', 'निळकंठ मास्तर' असे अनेक मराठी चित्रपट केले आहेत.  नेहाने मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

सध्या नेहा बँकॉकमध्ये तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बँकॉकमधील फोटो नेहा इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत तिने यलो रंगाचा वनपीस घातला आहे. नेहाचा हा फोटो तिच्या फॅन्सना आवडला आहे.  मात्र नक्की बँकॉकमध्ये ती कोणत्या सिनेमाचे शूटिंग करतेय हे अद्याप गुलदस्त्यात आहे.  


नेहासाठी प्रकाशझोतात यायला कारणीभूत ठरला तिचा  न्यूड एमएमएस.  हॉलीवुड स्टाईलनं नेहानं स्वतःला एक्सपोझ केल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सोशल मीडिया आणि व्हॉट्स ऍपवर याच व्हिडीओची चर्चा अधिक झाली होती.

Web Title: Neha mahajan doing shooting in bangkok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.