एप्रिलमध्ये 'HEAT' वाढणारे!, असं का म्हणतेय नेहा खान, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 05:32 PM2020-04-20T17:32:26+5:302020-04-20T17:34:07+5:30

नेहा खान बोल्ड व ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमी चर्चेत येत असते.

Neha Khan's movie shikari completed 2 years, she shared memories on instagram | एप्रिलमध्ये 'HEAT' वाढणारे!, असं का म्हणतेय नेहा खान, जाणून घ्या याबद्दल

एप्रिलमध्ये 'HEAT' वाढणारे!, असं का म्हणतेय नेहा खान, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

नेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती. या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.

नेहा खानने शिकारी चित्रपटातील आठवणी शेअर करत लिहिले की, 20 एप्रिल से गरमी बढनेवाली है शिकारी या चित्रपटाच्या टॅगलाइनने माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. शिकारीला दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने सेलिब्रेशन करत आहे. तुम्हाला माझ्या प्रवासाबद्दल माहित आहे. आयुष्यात मी बऱ्याच गोष्टीचा सामना केला आहे. आता माझ्या भूतकाळाबद्दल सांगतानाही माझ्या डोळ्यात पाणी आले आहे. मी महेश मांजरेकर सरांची आभारी आहे. त्यांनी या सिनेमात काम करण्याची संधी दिल्यामुळे माझे आयुष्य बदलले. मला ओळख दिली आणि या सुंदर इंडस्ट्रीत दाखल केले.

नेहा खान शिकारी चित्रपटानंतर 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमधल्या त्याच्या कामाचे खूप कौतूक झाले. नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करीत असते. त्यात ती हॉट अंदाजात पहायला मिळते.

नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केलं आहे. याशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती.

इतकेच नाही तर नेहा शाहरूख खानसोबत जाहिरातीत झळकली आहे. 'युवा' या हिंदी चित्रपटात तिने जिम्मी शेरगिलसोबत काम केलं आहे.

Web Title: Neha Khan's movie shikari completed 2 years, she shared memories on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.