कुणी घर देता का घर?, असं म्हणत हतबल होऊन रस्त्यावर फिरणाऱ्या आणि आपलं गतवैभव शोधणाऱ्या महान कलाकाराची शोकांतिका मांडणारी कलाकृती म्हणजे नटसम्राट. शेक्सपियरच्या गाजलेल्या शोकांतिकांपासून प्रेरित होऊन वि.वा.शिरवाडकर यांनी सत्तरच्या दशकात नटसम्राट हे नाटक रंगभूमीवर आणलं.

 

या नाटकातल्या गणपतराव म्हणजेच आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तीरेखा नाट्यरसिकांना भावली आणि या नाटकाने रंगभूमीवर इतिहास रचला. प्रत्येक मराठी रसिकाच्या मनावर या नाटकाचं गारूड आजही कायम आहे. याच नाटकावर आधारित नटसम्राट हा सिनेमाही रूपेरी पडद्यावर प्रचंड लोकप्रिय ठरला. या नाटकात नाना पाटेकर यांनी साकारलेली आप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका रसिकांच्या काळजात घर करून गेली.  हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा प्रचंड लोकप्रिय ठरला होता.

 

काही कलाकृती या कालातीत असतात. या कलाकृतींचा कितीही आस्वाद घेतला तरी रंजनाची भूक शमत नाही.  अशा कलाकृतींच्या यादीतील 'नटसम्राट' या लोकप्रिय चित्रपटाच्या स्मरणरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा घेता येणार आहे. मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मने जिंकणारा हा चित्रपट  शुक्रवार २७ नोव्हेंबरपासून पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे.  

कोरोनामुळे गेले कित्येक महिने बंद असलेली चित्रपटगृहे अनलॉकअंतर्गत पुन्हा सुरु झाली आहेत. पुन्हा एकदा   चित्रपटांचे दिमाखदार पोस्टर चित्रपटगृहांबाहेर झळकताना दिसू लागले आहेत. हळूहळू का होईना प्रेक्षकांची पावले चित्रपटगृहाकडे वळताहेत. अशावेळी या रसिकप्रिय चित्रपटांचे प्रदर्शन म्हणजे सिंगल स्क्रीन व मल्टिप्लेक्स यांना नवचैतन्य देण्याचा प्रयत्न ठरणार आहे.
खाली दिलेल्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट झळकणार आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Natsamrat' to hit theaters again, find out when and in which theater it will be screened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.