'नाकावरच्या रागाला औषध काय...' या गाण्यातील छोटी चिमुरडी आठवतेय ना, 31 वर्षांनंतर दिसते ती अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 07:00 AM2020-08-19T07:00:00+5:302020-08-19T07:00:00+5:30

'कळत नकळत' चित्रपटातील छकुली आता मोठी झाली असून ती आता संसारात रमली आहे.

Nakavarchya Ragala Aushad Kay song fame child actress now looking so different | 'नाकावरच्या रागाला औषध काय...' या गाण्यातील छोटी चिमुरडी आठवतेय ना, 31 वर्षांनंतर दिसते ती अशी

'नाकावरच्या रागाला औषध काय...' या गाण्यातील छोटी चिमुरडी आठवतेय ना, 31 वर्षांनंतर दिसते ती अशी

googlenewsNext

कळत नकळत हा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे आणि अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील एक गाणं आजही लोकांच्या लक्षात आहे. ते गाणे आहे नाकावरच्या रागाला औषध काय? गालावरच्या फुग्ग्यांचं म्हणणं तरी काय? या गाण्यात अभिनेते अशोक सराफ आपल्या रुसलेल्या भाचीला म्हणजेच छकुलीला समजावताना दिसत आहेत. हे गाणे आजही अनेकजण गुणगुणताना दिसतात.

कळत नकळत या चित्रपटातील ती चिमुरडी आता मोठी झाली असून ती अभिनय क्षेत्रात कार्यरत नाही. या चित्रपटात छकुलीची भूमिका मृण्मयी चांदोरकर हिने साकारली आहे.



कळत नकळत चित्रपटातील छकुली अर्थात मृण्मयी चांदोरकर ही प्रसिद्ध लेखक व.पू.काळे यांची नात आहे. व. पू. काळे एक सुप्रसिद्ध लेखक, कथाकथनकार आणि कादंबरीकार म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यातील ही वाट एकटीची, ठिकरी, साथी अशी पुस्तके खूपच प्रसिद्धी मिळवून गेली.

त्यांची मुलगी स्वाती चांदोरकर या देखील एक प्रसिद्ध लेखिका म्हणून ओळखल्या जातात. एक पायरी वर, अनाहत, काळाक भिन्न, शेष, उत्खनन ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. मृण्मयी चांदोरकर ही स्वाती चांदोरकर यांची मुलगी आहे.

एक बालकलाकार म्हणून मृण्मयीने कळत नकळत चित्रपटात काम केले होते. परंतु पुढे मात्र ती कधी कोणत्या चित्रपटात पाहिली गेली नाही. मृण्मयीचेही लग्न झाले असून ती आपल्या घर संसारात रमली आहे.

Web Title: Nakavarchya Ragala Aushad Kay song fame child actress now looking so different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.