Exclusive गश्मिर महाजनी साकारणार नागार्जुन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 03:05 PM2016-12-25T15:05:07+5:302016-12-25T15:05:07+5:30

बेनझीर जमादार बॉलिवुडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा रिमेक बनविण्याची परंपरा ही पहिल्यापासून पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे बॉलिवुडमध्ये दाक्षिणात्य रिमेक हीट असल्याचेदेखील ...

Nagarjuna to be the exclusive goshmari mahajani | Exclusive गश्मिर महाजनी साकारणार नागार्जुन

Exclusive गश्मिर महाजनी साकारणार नागार्जुन

googlenewsNext
बेनझीर जमादार


बॉलिवुडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा रिमेक बनविण्याची परंपरा ही पहिल्यापासून पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे बॉलिवुडमध्ये दाक्षिणात्य रिमेक हीट असल्याचेदेखील दिसत आहे. आता हाच फॉर्मुला सध्या मराठी चित्रपटसृष्ट्रीत पाहायला मिळणार आहे असे वाटत आहे. कारण दाक्षिणात्य चित्रपटांचा मराठी रिमेक बनविण्याची क्रेझ निर्माण झालेली दिसत आहे. आता हेच पाहा ना, देवा आगामी मराठी चित्रपटदेखील दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी, स्पृहा जोशी आणि तेजिस्वनी पंडित हे तगडे कलाकार पाहायला मिळणार आहे. आता याच्यापाठोपाठ आणखी एक दाक्षिणात्य चित्रपटाचा मराठी रिमेक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांचा लाडका अभिनेता गश्मिर महाजनी झळकणार आहे. त्याच्या रिमेकविषयी गश्मिर लोकमत सीएनएक्सला सांगतो, या दाक्षिणात्य चित्रपटात मी नागार्जुनची भूमिका साकारणार आहे. त्याच्या या चित्रपटाकडून आमच्या टीमने संपूर्ण हक्क घेतलेले आहे. तो स्वत:देखील खूप आनंदित आणि उत्साहित आहे की, त्याची ही भूमिका मी कशा पध्दतीने स्वीकारणार आहे. तसेच मीदेखील खूपच आनंदित आहे कारण यापूर्वी अशी भूमिका मी कधी स्वीकारली नव्हती. तसेच या चित्रपटात मी रोमँण्टिक भूमिकेमध्ये दिसणार आहे. खूप इंटरेस्टिंग असा हा रिमेक असणार आहे. मात्र प्रेक्षकांना या रिमेकसाठी वाट पाहावी लागणार आहे. या दाक्षिणात्य चित्रपटाकडून सर्व हक्क घेतले आहे. हा चित्रपट कोणाचा असणार आहे. यामध्ये कोण कलाकार माझ्यासोबत असणार आहे हे अदयापदेखील गुलदस्त्यात आहे. नुकतेच गश्मिरने डोंगरी का राजा या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवुडमध्ये पदापर्ण केले आहे. तसेच मराठीमध्ये त्याने वन वे तिकीट, कान्हा असे अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. 

Web Title: Nagarjuna to be the exclusive goshmari mahajani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.