'माझं कुटुंब माझी जबाबदारी!', सुबोध भावेनं लोकांना मास्क घालण्याचं केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 04:45 PM2021-04-29T16:45:57+5:302021-04-29T16:46:30+5:30

अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.

'My family is my responsibility!', Subodh Bhave appealed to people to wear masks | 'माझं कुटुंब माझी जबाबदारी!', सुबोध भावेनं लोकांना मास्क घालण्याचं केलं आवाहन

'माझं कुटुंब माझी जबाबदारी!', सुबोध भावेनं लोकांना मास्क घालण्याचं केलं आवाहन

googlenewsNext

देशात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. राज्यातही कोरोनाचे संकट वाढताना दिसते आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. तरीदेखील काही जण विनाकारण बाहेर भटकत आहेत आणि नियमांचे पालनही करताना दिसत नाहीत. दरम्यान आता मराठी चित्रपटसृष्टीतला अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्याने माझं कुटुंब माझी जबाबदारी असेदेखील आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.


सुबोध भावेने इंस्टाग्रामवर एकाच पोस्टमध्ये दोन फोटो टाकले आहेत. एका फोटोत त्याने मास्क घातलेला दिसतो आहे आणि दुसऱ्या फोटोत मास्क घातलेला नाही. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले की,  पहिला- मी मास्क वापरतो कारण मला कुटुंबाची काळजी आहे, माझं कुटुंब माझी जबाबदारी!
दुसरा- मी मास्क वापरणार नाही कारण मला माझ्यासकट कोणाचीच काळजी नाही,आणि मुळात कोरोना वगैरे काही नसतंच!
आपल्याला कुठला चेहरा व्हायचंय ते आपण ठरवायचं.? माझी आणि माझ्या कुटुंबाची सुरक्षा हीच माझी जबाबदारी!


या पोस्टच्या माध्यमातून सुबोध भावेने समाजातील दोन प्रकारच्या माणसांचे दर्शन घडविले आहे.
सुबोध भावेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटचा तो चंद्र आहे साक्षीला या मालिकेत पहायला मिळाला. या मालिकेने काही दिवसांपूर्वी निरोप घेतला आहे.


'कट्यार काळजात घुसली' या अजरामर संगीत नाटकावर तितकाच उत्तम चित्रपट अभिनेता सुबोध भावेने दिग्दर्शित केला. या चित्रपटाला मिळाळेल्या अभूतपूर्व यशानंतर आता सुबोध भावे 'संगीत मानापमान' हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर घेऊन येतो आहे. या चित्रपटाचे नाव 'मानापमान' असून हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित केला जाणार आहे.

Web Title: 'My family is my responsibility!', Subodh Bhave appealed to people to wear masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.