चालत्या ट्रेनमध्ये ही मराठमोळी अभिनेत्री थिरकली 'छैय्या छैय्या...' गाण्यावर, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 07:00 AM2021-02-07T07:00:00+5:302021-02-07T07:00:00+5:30

मराठमोळी ही अभिनेत्री सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

In the moving train, this Marathmoli actress Thirkali on the song 'Chaiya Chaiya ...', video goes viral | चालत्या ट्रेनमध्ये ही मराठमोळी अभिनेत्री थिरकली 'छैय्या छैय्या...' गाण्यावर, व्हिडीओ व्हायरल

चालत्या ट्रेनमध्ये ही मराठमोळी अभिनेत्री थिरकली 'छैय्या छैय्या...' गाण्यावर, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील मालिका 'तुझं माझं ब्रेकअप'मधून मेनका नामक ग्रे शेड भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी सोशल मीडियावरील तिच्या नव्या व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

मीरा जोशी बऱ्याचदा सोशल मीडिया इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस फोटो आणि डान्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत येत असते. पुन्हा एकदा तिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती चालू ट्रेनमध्ये छैय्या छैय्या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. तिच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

मीरा फक्त मराठी वाहिनीवरील स्पेशल पोलीस फोर्स नामक मालिकेत झळकली होती. यात तिने एका सहायक पोलीस अधिकारीची भूमिका साकारली होती.


याशिवाय मीरा 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उसरणी येथे पार पडले आहे. या चित्रपटाबाबत मीराने सांगितले की, ''वृत्ती' चित्रपटात मी अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात माझ्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे.'


'वृत्ती' चित्रपटाची कथा एका गावात दोन दिवसात घडणाऱ्या गोष्टींवर आधारीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. अश्विन यांनी केले आहे. या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Web Title: In the moving train, this Marathmoli actress Thirkali on the song 'Chaiya Chaiya ...', video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.