Movie inogration happend In presence of singer sanjivini bhelande | गायिका संजीवनी भेलांडे यांच्या उपस्थिती पार पडला सिनेमाचा मुहूर्त
गायिका संजीवनी भेलांडे यांच्या उपस्थिती पार पडला सिनेमाचा मुहूर्त

चित्रपटाच्या मुहूर्तावर 'बदनाम गली' ह्या आगामी चित्रपटाच्या दोन गण्याचे रिकॉर्डिंग पार पडले, हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषेत प्रदर्शित होणार आहे. मुहूर्तावेळी एक रोमँटिक साँग , तर दुसरे आयटम सॉन्ग रिकॉर्ड करण्यात आले. रोमॅंटिक साँन्गला अभिजीत कोसंबी आणि  संजीवनी भेलांडे यांनी आपल्या आवाज चा साज चढवला आहे तर आइटम सॉन्ग सोनाली पटेलने गायले आहे. दोन्ही गाण्याचे चे गीतकार सुबोध पवार आहेत तर मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध केली आहेत.

 चित्रपट पोटासाठी शरीराचा सौदा करणाऱ्या वारांगणांच्या व्यथेची कथा आहे. "बदनाम गली" हा सिनेमा शारीरिकतेपेक्षा भावनिक तसेच मानसिक पातळीवर जास्त व्यक्त होतो. ह्या  चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक प्रा. दीपक संभाजी जाधव असून त्रिपुरेश्वर प्रोडक्शन बैनर अंतर्गत निर्माता श्याम चौगले निर्माण करत आहेत तसेच कार्यकारी निर्माता म्हणून पोपट कांबळे काम पाहतायेत. 

 चित्रपटाची स्टारकास्ट अजुन गुलदस्त्यात असून लवकरच जाहिर करण्यात येईल, सध्या चित्रपटाचे संगीत पूर्ण करण्यावर निर्माते आणि दिग्दर्शक यांचा भर आहे. चित्रपटाचा विषय सामाजिक व गंभीर असून स्टारकास्ट ही दमदार असेल यात शंका नाही

Web Title: Movie inogration happend In presence of singer sanjivini bhelande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.