ठळक मुद्देकेवळ सात तासांत 2 लाख 65 हजाराहून अधिक लाईक्स या फोटोला मिळाले आहेत.

'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्याने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथिलाने दाखवून दिली आहे. मिथिला नुकतीच रेणूका शहाणेच्या त्रिभंगा या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते.

मिथिला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकताच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून यात ती तिचे व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे, मिताली तिच्या कामात प्रचंड व्यग्र असते. ती चित्रीकरणातून वेळ काढून नुकतीच अलिबागला फिरायला गेली होती. तिने तिच्या व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. केवळ सात तासांत 2 लाख 65 हजाराहून अधिक लाईक्स या फोटोला मिळाले आहेत. 

इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून मितालीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटाद्वारे तिने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये देखील झळकली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mithila palkar shared vacation pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.