बॉलिवूड अभिनेत्रींना ही टाकेल मागे अशा आहेत या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 10:29 AM2020-01-02T10:29:36+5:302020-01-02T10:39:38+5:30

आतापर्यंत या फोटोला 2 लाख 75 हजार लाईक्स आले आहेत.

Mithila palkar share her hot photo on instagram | बॉलिवूड अभिनेत्रींना ही टाकेल मागे अशा आहेत या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हॉट अदा

बॉलिवूड अभिनेत्रींना ही टाकेल मागे अशा आहेत या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हॉट अदा

googlenewsNext

सिनेइंडस्ट्रीत जोरदार एंट्री केल्यानंतर तिच्या अभिनयासह तिच्या बोल्ड फोटोची ही वारंवार चर्चा होत असते. दरवेळी काही तरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या मिथीला पालकर आता पुन्हा एकदा आपला नवा अंदाजात आपल्या समोर आली आहे.  ती नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरते. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत मिथिला बीचवर पाण्याचा आनंद लुटताना दिसते आहे. या फोटोत तिने काळ्या रंगाचा गॉगल आणि डोक्यावर टोपी घातलेली दिसतेय. तिच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव करण्यात आला आहे.   


मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत मिथिला पालकरने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी आणि एक उत्स्फूर्त तसेच कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते.

मिथीला कप साँगमुळे अल्पवधीतच साऱ्यांची लाडकी बनली होती. तिने वेबविश्वात अक्षरक्षः धुमाकूळ घातला होता. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते.


इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.

Web Title: Mithila palkar share her hot photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.