मिथिलाचे हे फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी, पण 3 लाख लोकांनी पाहिलेल्या या फोटोंमध्ये असं आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 10:57 AM2019-08-13T10:57:44+5:302019-08-13T10:59:28+5:30

 कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. 

Mithila Palkar share her gorgeous photo on instagram | मिथिलाचे हे फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी, पण 3 लाख लोकांनी पाहिलेल्या या फोटोंमध्ये असं आहे तरी काय?

मिथिलाचे हे फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी, पण 3 लाख लोकांनी पाहिलेल्या या फोटोंमध्ये असं आहे तरी काय?

googlenewsNext

'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे.  कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. 


एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथीलाने दाखवून दिली आहे.

मिथीला आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते.


विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. मिथिलाने नुकतेच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने साडी परिधान केली आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही तिचे फोटो सा-यांचे आकर्षण ठरत आहे. तिचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसून येत आहे. तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. 


इरफान  खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती. 

Web Title: Mithila Palkar share her gorgeous photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.