उफ्फ तेरी अदा, मिथिलाचा फोटो पाहून तुम्हीही द्याल अशीच रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 05:04 PM2020-02-27T17:04:00+5:302020-02-27T17:10:49+5:30

आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी आणि एक उत्स्फूर्त तसेच कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते

Mithila palkar share her glamour photo on instagram gda | उफ्फ तेरी अदा, मिथिलाचा फोटो पाहून तुम्हीही द्याल अशीच रिअ‍ॅक्शन

उफ्फ तेरी अदा, मिथिलाचा फोटो पाहून तुम्हीही द्याल अशीच रिअ‍ॅक्शन

googlenewsNext

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत मिथिला पालकरने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी आणि एक उत्स्फूर्त तसेच कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. मिथीला कप साँगमुळे अल्पवधीतच साऱ्यांची लाडकी बनली होती. तिने वेबविश्वात अक्षरक्षः धुमाकूळ घातला होता. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते.


सिनेइंडस्ट्रीत जोरदार एंट्री केल्यानंतर तिच्या अभिनयासह तिच्या बोल्ड फोटोची ही वारंवार चर्चा होत असते. दरवेळी काही तरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या मिथीलाने तिचा एक फोटो शेअर केला. यात तिने ब्लॅक रंगाच्या वनपीसमध्ये फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.


इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.

Web Title: Mithila palkar share her glamour photo on instagram gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.