तिरछी टोपीवाली लडकी भोली भाली, या मराठी अभिनेत्रीने शेअर केले कॉलिफोर्नियातील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 07:15 AM2019-09-24T07:15:00+5:302019-09-24T07:15:00+5:30

आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणून हिच्याकडे पाहिले जातं. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते.

Mithila palkar share her california photos on social media | तिरछी टोपीवाली लडकी भोली भाली, या मराठी अभिनेत्रीने शेअर केले कॉलिफोर्नियातील फोटो

तिरछी टोपीवाली लडकी भोली भाली, या मराठी अभिनेत्रीने शेअर केले कॉलिफोर्नियातील फोटो

googlenewsNext

आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणून हिच्याकडे पाहिले जातं. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथीला पारकरने दाखवून दिली आहे.


मिथीला सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत ती फॅन्सशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते.  सध्या मिथीला कॉलिफोर्नियामध्ये तिथल्या क्रूझच्या डेकवरचा फोटो तिने शेअर केला आहे. या फोटोत ती टोपी घालून पाठमोरी उभी आहे.  


मुरांबा या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात तिने दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. तिने कारवां या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'माझा हनीमून'मध्येही तिच्या अभिनयाचे विशेष कौतूक झाले.

गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून तिला ओळख मिळाली. इरफान  खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती. 

Web Title: Mithila palkar share her california photos on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.