अतिथी देवो भव:! सिद्धार्थ-मितालीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 10:36 AM2021-09-23T10:36:03+5:302021-09-23T10:37:51+5:30

Mitali mayekar : मितालीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

mitali mayekar share video on instagram and write captaion atithi devo bhav | अतिथी देवो भव:! सिद्धार्थ-मितालीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

अतिथी देवो भव:! सिद्धार्थ-मितालीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

googlenewsNext
ठळक मुद्देमितालीने मुक्या प्राण्याला केलेली मदत पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर. २०२१ मध्ये लग्नगाठ बांधलेली ही जोडी आज अनेकांचं लाडकं कपल म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच सोशल मीडियावर या जोडीची कायमच चर्चा होत असते. विशेष म्हणजे हे दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून अनेकदा ते त्यांच्या जीवनातील लहानमोठे क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात.  त्यातच सध्या मितालीने शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चिली जात आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं सांगितलं आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या मितालीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने तिच्या घरी नवीन पाहुणा आल्याचं म्हटलं आहे. सोबतच अतिथी देवो भव: असंही तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे हा नवा पाहुणा कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

मितालीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या घराच्या खिडकीत एक लहानसं माकड आलं असून मितालीने त्याचा चांगलाच पाहुणचार केला आहे. या माकडाला तिने पहिले प्यायला पाणी दिलं आणि त्यानंतर मग खायला सफरचंददेखील दिलं. हा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

पत्नीला घटस्फोट देणारे प्रकाश राज पडले 'या' नृत्यदिग्दर्शिकेच्या प्रेमात

दरम्यान, मितालीचा हा व्हिडीओ  नेटकऱ्यांना प्रचंड आवडला असून तिने एका मुक्या प्राण्याला केलेली मदत पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मिताली आणि सिद्धार्थ दोघंही प्राणीप्रेमी आहेत. त्यामुळे अनेकदा ते सोशल मीडियावर प्राण्यांचे काही व्हिडीओ शेअर करत असतात. या दोघांकडे डोरा नावाची एक पाळीव श्वानदेखील आहे. तिच्यासोबतचेदेखील अनेक फोटो त्यांनी शेअर केले आहेत. 
 

Web Title: mitali mayekar share video on instagram and write captaion atithi devo bhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.