ठळक मुद्देमितालीने नुकतेच एक फोटोशूट केले असून तिने या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोत ती अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसत असून तिचा हा स्टनिंग लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

मिताली मयेकर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या खाजगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससोबत शेअर करते. ती आपले वैयक्तिक आणि कुटुंबियांचे फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण या फोटोंमध्ये आपल्याला मितालीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

मितालीने नुकतेच एक फोटोशूट केले असून तिने या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोत ती अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसत असून तिचा हा स्टनिंग लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. मिताली या लूकमध्ये खूपच छान दिसत असल्याचे तिचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

‘उर्फी’ चित्रपटातून मितालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीने काम केलं. तिचा काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थ चांदेकरसोबत साखरपुडा केला. गुलाबजाम, क्लासमेट यांसारखे अनेक चित्रपट ‘अग्निहोत्र’, ‘प्रेम हे’ यांसारख्या मालिकेतून सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्या दोघांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून त्यांच्या दोघांचे अनेक फोटो आपल्याला त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात. 

सिद्धार्थ आणि मिताली लवकरच एका ऑस्ट्रेलियन चित्रपटात झळकणार आहेत. हे दोघंही चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. सिद्धार्थने याबाबत सांगितले होते की, ‘हा चित्रपट म्हणजे एक कौटुंबिक ड्रामा आहे. एक रोड ट्रीप हा विषय यात हाताळला गेला आहे. आलोक राव हा चित्रपट दिग्दर्शित करतोय.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mitali Mayekar bold photoshoot viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.