या मराठी अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटनं सर्वांना केलं घायाळ, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 06:30 AM2019-09-26T06:30:00+5:302019-09-26T06:30:00+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील ही अभिनेत्री आहे उत्तम डान्सर

Meera Joshi's New photoshoot made everyone want to see her glamorous photo | या मराठी अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटनं सर्वांना केलं घायाळ, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

या मराठी अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटनं सर्वांना केलं घायाळ, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील मालिका 'तुझं माझं ब्रेकअप'मधून मेनका नामक ग्रे शेड भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. तिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

मीरा जोशीने इंस्टाग्रामवर काळ्या रंगाच्या आऊटफिट आणि गॉगल घातलेला फोटो शेअर करून तिने म्हटलं की, बाकी सब फर्स्ट क्लास है. 


तिचे चाहते या फोटोंवर कमेंट्स करत आहेत.

मीरा 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात ती अंजलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उसरणी येथे पार पडले आहे.


या चित्रपटाबाबत मीराने सांगितले की, ''वृत्ती' चित्रपटात मी अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात माझ्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे. यात मालवणी टच असणार आहे. मला मालवणी येत नाही. त्यासाठी आमचे वर्कशॉप झाले. '


या चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल मीरा म्हणाली की, 'या चित्रपटाचे चित्रीकरण दोन शेड्युलमध्ये उसरणी येथे नुकतेच पार पडले. माझे सात-आठ दिवसाचे चित्रीकरण होते. उसरणी येथे चित्रीकरणाचा खूपच छान अनुभव होता. या ठिकाणी आतापर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण झालेले नाही. आम्ही या गावातच राहिलो होतो. उसरणी बीच खूपच छान असून निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे.' 


'वृत्ती' चित्रपटाची कथा एका गावात दोन दिवसात घडणाऱ्या गोष्टींवर आधारीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. अश्विन यांनी केले आहे.

या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Meera Joshi's New photoshoot made everyone want to see her glamorous photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.