‘कच्चा बदाम खाऊन मला अशी अक्कल आली की...’, अमेय वाघची ‘लय भारी’ पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 06:16 PM2022-04-22T18:16:18+5:302022-04-22T18:16:46+5:30

Amey Wagh : ‘मी वसंतराव’ चित्रपटाच्या निमित्ताने अमेयने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्याची चांगलीच चर्चा रंगलीये.

Me Vasantrao movie marathi actor amey wagh share song reel video |  ‘कच्चा बदाम खाऊन मला अशी अक्कल आली की...’, अमेय वाघची ‘लय भारी’ पोस्ट

 ‘कच्चा बदाम खाऊन मला अशी अक्कल आली की...’, अमेय वाघची ‘लय भारी’ पोस्ट

googlenewsNext

अमेय वाघ (Amey Wagh) हा तरूणाईचा आवडता अभिनेता. सध्या या गड्याची चांगलीच चर्चा आहे. कारणही खास आहे. अमेयचा ‘मी वसंतराव’  (Me Vasantrao) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याने दिनानाथ मंगेशकर यांची भूमिका साकारली आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने अमेयने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्याची चांगलीच चर्चा रंगलीये.
व्हिडीओतअमेय हा गाडीत बसून ‘मी वसंतराव’या चित्रपटातील एक गाणं गुणगुणतांना दिसतो. अगदी एखाद्या मुरलेल्या  शास्त्रीय गायकाप्रमाणे  हातवारे करत तो गातोय. या व्हिडीओत अमेयला गातांना बघणं एक वेगळा अनुभव आहे. तो तुम्ही पाहायलाच हवा. पण सोबत या व्हिडीओला अमेयनं दिलेल्या कॅप्शनकडेही लक्ष द्यायला हवं. होय, व्हिडीओला अमेयनं हटके कॅप्शन दिलं आहे.

‘कच्चा बदाम खाऊन मला अशी अक्कल आली की मराठी गाण्यांवरच चांगले रिल बनवता येतात...,’ असं भारी कॅप्शन त्याने दिलं आहे. ‘मी वसंतराव’चा तिसरा आठवडा सुरु! लवकर बघा!, असं आवाहनही या पोस्टमध्ये त्याने केलं आहे.  

यावर चाहत्यांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्सही दिल्या आहेत. वाघाचा स्वॅग, अशी कॅप्शन एकाने दिली आहे. गाडी पुढं काऊन जाईना दादा, असा मजेशीर सवाल एका चाहत्याने केला आहे. अनेकांनी अमेयच्या गायकीचं आणि ‘मी वसंतराव’च्या गाण्याचं कौतुक केलं आहे.
‘मी वसंतराव’ हा चित्रपट सध्या चांगलीच गर्दी खेचतोय. या चित्रपटात पंडित वसंतराव देशपांडे या हरहुन्नरी, प्रतिभाशाली शास्त्रीय गायकाचा जीवन प्रवास दाखवला गेला आहे. चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Web Title: Me Vasantrao movie marathi actor amey wagh share song reel video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.