Video: अमृता अन् प्राजक्ता आमनेसामने; 'चंद्रमुखी'मध्ये रंगणार दोघींची जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 06:32 PM2022-04-26T18:32:18+5:302022-04-26T18:33:00+5:30

Chandramukhi : यापूर्वी या चित्रपटातील ठुमकेदार लावणी, तरल प्रेमगीत, कृष्णप्रेम व्यक्त करणाऱ्या, श्रृंगाराने सजलेल्या चंद्राची बैठकीची लावणी आपल्या समोर आली आहे. मात्र, आता सवाल जवाबचा फड रंगणार आहे.

marathi upcoming movie chandramukhi actress prajakta mail play dance performance | Video: अमृता अन् प्राजक्ता आमनेसामने; 'चंद्रमुखी'मध्ये रंगणार दोघींची जुगलबंदी

Video: अमृता अन् प्राजक्ता आमनेसामने; 'चंद्रमुखी'मध्ये रंगणार दोघींची जुगलबंदी

googlenewsNext

अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक (prasad oak ) याने 'चंद्रमुखी' (chandramukhi) या आगामी चित्रपटाची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर केवळ चंद्रा या एकाच व्यक्तीरेखेची चर्चा रंगली आहे. आपल्या मोहमयी रुपाने, अदांनी आणि नृत्यकौशल्यांना अनेकांना प्रेमात पाडणाऱ्या या चंद्राची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) साकारत आहे. विशेष म्हणजे या चंद्राचा सामना करण्यासाठी तिच्यासमोर अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) उभी ठाकली आहे. या दोघींमध्ये 'चंद्रा'वर  रंगलेली जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

यापूर्वी या चित्रपटातील ठुमकेदार लावणी, तरल प्रेमगीत, कृष्णप्रेम व्यक्त करणाऱ्या, श्रृंगाराने सजलेल्या चंद्राची बैठकीची लावणी आपल्या समोर आली आहे. मात्र, आता सवाल जवाबचा फड रंगणार आहे. या लावणीला गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून त्याला अजय-अतुल यांचे दमदार संगीत लाभले आहे. तर मधुरा दातार, प्रियांका  बर्वे आणि विश्वजीत बोरवणकर यांच्या आवाजाने रंगत आणली आहे. दिपाली विचारे यांचे नृत्यदिग्दर्शन असलेला हा ठसकेदार लावणीचा प्रकार आता प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. 

‘’ या चित्रपटात आम्ही श्रृंगारिक लावणी, बैठकीची लावणी, सवाल जवाब असे लावणीचे विविध प्रकार हाताळले आहेत. या निमित्ताने लोककलेचा समृध्द वारसा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘चंद्रमुखी’तील इतर गाण्यांप्रमाणे सवाल जवाबची रंगलेली ही चुरसही रसिकांना भावेलत’’ असं प्रसाद ओक म्हणाला.
 
दरम्यान, प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाईटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: marathi upcoming movie chandramukhi actress prajakta mail play dance performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.