Video: ...जेव्हा चंद्रमुखीच्या तालावर नाचतो दादूस; पाहा विनायक माळीचा भन्नाट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 04:54 PM2022-04-24T16:54:49+5:302022-04-24T16:55:47+5:30

Chandramukhi: 'चंद्रा' या गाण्यावर ताल धरायचा मोह विनायक माळीही अवरला नाही. त्यानेही थेट अमृताला गाठत तिच्यासोबत या गाण्यावर डान्स केला

marathi upcoming movie chandramukhi actress amruta khanvilkar and dadus aka vinayak mali dance video viral | Video: ...जेव्हा चंद्रमुखीच्या तालावर नाचतो दादूस; पाहा विनायक माळीचा भन्नाट व्हिडीओ

Video: ...जेव्हा चंद्रमुखीच्या तालावर नाचतो दादूस; पाहा विनायक माळीचा भन्नाट व्हिडीओ

googlenewsNext

मराठी कलाविश्वात सध्या एका पाठून एक अनेक दर्जेदाक कलाकृतींची निर्मिती होताना पाहायला मिळत आहे. यामध्येच विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित चंद्रमुखी हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  त्यामुळे या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे मुख्य भूमिका साकारत आहे. अलिकडेच या चित्रपटातील 'चंद्रा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. अनेकांनी या गाण्यावर भन्नाट व्हिडीओ शेअर केले. विशेष म्हणजे या गाण्यावर ताल धरायचा मोह सर्वाचा लाडका दादूस अर्थात विनायक माळी यालाही अवरला नाही. त्यानेही थेट अमृताला गाठत तिच्यासोबत या गाण्यावर डान्स केला.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली अमृता सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटाशी निगडीत अनेक अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे. यामध्येच तिने आता विनायकसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती विनायकसोबत डान्स करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विनायक, अमृताची भेट घेतो आणि तिच्याकडे चंद्रा गाण्यावरील लावणी शिकवण्याचा हट्ट करतो. विशेष म्हणजे अमृताही त्याला शिकवायला तयार होते. मात्र, दादूसला काही केल्या एकही डान्स स्टेप येत नाही. अखेर कंटाळून ती तिला शिकवणं बंद करते आणि २९ तारखेला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघ आणि तिथेच काय ती लावणी शिक असा सल्ला देते.

दरम्यान, 'कच्चा लिंबू', 'हिरकणी' यांसारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांची जबरदस्त जोडी 'चंद्रमुखी' सारख्या भव्यदिव्य चित्रपटाच्या निमित्ताने हॅट्रिक करत आहे.  'चंद्रमुखी' या चित्रपटाची पटकथा आणि संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे यांच्यासोबतच मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, सुरभी भावे, राधा सागर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 
 

Web Title: marathi upcoming movie chandramukhi actress amruta khanvilkar and dadus aka vinayak mali dance video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.