Rada: साउथ टच असलेल्या ‘राडा’सिनेमाला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 07:16 PM2022-09-30T19:16:43+5:302022-09-30T19:21:49+5:30

सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत चर्चेत असलेला 'राडा' (raada) चित्रपट अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Marathi movie 'Radha' getting positive response from audience | Rada: साउथ टच असलेल्या ‘राडा’सिनेमाला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

Rada: साउथ टच असलेल्या ‘राडा’सिनेमाला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

googlenewsNext

 सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत चर्चेत असलेला 'राडा' (raada) चित्रपट अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 
फुल्ल ऑफ अॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या सिनेमाला साऊथचा टच असल्यामुळे पोस्टरपासून ते ट्रेलरपर्यंत प्रत्येक गोष्ट चर्चेत राहिली. आता प्रेक्षकांची पसंती देखील या सिनेमाला मिळताना दिसतेय. 

राम शेट्टी निर्मित 'राडा' या चित्रपटात अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार हा मुख्य भूमिका साकारत असून समा असं त्याच्या भूमिकेचं नाव आहे. हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. आकाशसोबत या चित्रपटात मिलिंद गुणाजी (milind gunaji), संजय खापरे (sanjay khapre), गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य (Ganesh Acharya) , निशिगंधा वाड (nishigandha wad), योगिता चव्हाण yogita chavan) , सिया पाटील, हिना पांचाळ (heena panchal), शिल्पा ठाकरे हे कलाकार झळकले आहेत.


दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा पेलवल्या आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना आणि मयुरेश केळकर यांनी सांभाळली असून गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. तर गायक जसराज, मधुर शिंदे यांनी चित्रपटातील गाण्यांना स्वरबद्ध केले आहे. तर हा भव्य ऍक्शनपट के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

 

Web Title: Marathi movie 'Radha' getting positive response from audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा