मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलनंतर तुर्कीमध्येही मराठीचा डंका, पगल्या सिनेमाने जिंकला पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 04:16 PM2021-05-03T16:16:47+5:302021-05-03T16:30:23+5:30

लहान मुलांच्या भावविश्वात पाळीव प्राण्यांचे असणारे स्थान आणि प्राण्यांबद्दल असणाऱ्या त्यांच्या निरागस भावना या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Marathi film puglya wins best foreign feature award at moscow international film festival | मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलनंतर तुर्कीमध्येही मराठीचा डंका, पगल्या सिनेमाने जिंकला पुरस्कार

मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलनंतर तुर्कीमध्येही मराठीचा डंका, पगल्या सिनेमाने जिंकला पुरस्कार

googlenewsNext

'पगल्या या चित्रपटाने मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021 (Moscow International Film Festival 2021) मध्ये समीक्षकांची मने जिंकल्यानंतर दिग्दर्शक विनोद पीटर यांनी 'ग्लॅडिएटर फिल्म फेस्टिव्हल' (टीजीएफएफ) तुर्की येथे 'पगल्या' या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आणि ओन्को एस्टोनिया इथे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकाविला आहे. लहान मुलांच्या भावविश्वात पाळीव प्राण्यांचे असणारे स्थान आणि प्राण्यांबद्दल असणाऱ्या त्यांच्या निरागस भावना या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आजपर्यंत, या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचे नाव शिरोपेचात रोवले गेले आहे. इतकेच नाही तर आत्तापर्यंत जगभरातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये 47 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद सॅम पीटर यांनी केले आहे.  

या चित्रपटाबाबत निर्माते-दिग्दर्शक विनोद सॅम पीटर म्हणतात की, "एक निर्माता म्हणून माझ्या पहिल्याच चित्रपटाला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळतेय ते पाहून मी खूप खूष आहे. अधिकृत निवडीबद्दलच नाही तर अनेक महोत्सवात या चित्रपटाला मिळालेले पुरस्कार गौरवास्पद आहेत. मला आनंद होत आहे की, एका मराठी चित्रपटाला विविध देशांमध्ये आपली ओळख मिळत आहे. असे बरेच काही फिल्म फेस्टीवल झाले आहेत ज्यांत निवडलेल्या किंवा पुरस्कार मिळालेल्या यादिंमध्ये ’पगल्या’ हा पहिला चित्रपट आहे. भारताचा झेंडा जगभरात झळकल्याचा आपल्याला अभिमानच वाटतो."

‘पगल्या’ या मराठी चित्रपटाला मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021 चा (Moscow International Film Festival 2021) बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड मिळाला आहे. तसेच इटली, अमेरिका, युके आणि स्वीडन या देशातील चित्रपट महोत्सवात देखील या चित्रपटाची निवड झाली आहे. या सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर दाद मिळत आहे. या सिनेमाला कॅलिफोर्नियातील लॉस वर्ल्ड प्रीमियरमध्येही गौरवण्यात आलं. याशिवाय लंडन, इटली, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, तुर्की, इराण, अर्जेंटिना, लेबनन, बेलारुस, रशिया, कझाकिस्तान, इज्रायल, अमेरिका आणि कॅनडामध्ये विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये सन्मान मिळवले आहेत. तसेच कॅलिफोर्निया येथे झालेल्या वर्ल्ड प्रीमिअर फिल्म अवॉर्ड या पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक विनोद पीटर यांच्या ‘पगल्या’ या चित्रपटाने बाजी मारली आहे.
 

Web Title: Marathi film puglya wins best foreign feature award at moscow international film festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी