ठळक मुद्देप्रिया बेर्डे झळकणार 'अहिल्या' या चित्रपटात

मराठी चित्रपट व मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा नुकताच 'रंपाट' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांच्यासोबत मुलगा अभिनय बेर्डेदेखील रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. या चित्रपटात ते मायलेकाच्या भूमिकेत पहायला मिळत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

या चित्रपटातील अनुभवाबद्दल प्रिया बेर्डे यांनी सांगितले होते की, मला आनंद होतो आहे की, मी अभिनयसोबत दुसऱ्यांदा चित्रपटात काम केले. सेटवर आमच्या दोघांचाही अ‍ॅटिट्युड प्रोफेशनल होता. मी त्याच्या कुठल्याही कामात दखल घेत नाही किंवा सेटवर जात नाही. पण, यावेळेस आम्ही एकाच सेटवर होतो. एखाद दुसऱ्या सल्ल्याशिवाय मी त्याच्या कामात अजिबात ढवळाढवळ केली नाही. यश व अपयश दोन्हीला सामोरे जात त्याने अनुभवाने समृद्ध व्हावे, असे मला वाटते. 


या चित्रपटाशिवाय प्रिया बेर्डे 'अहिल्या' या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात त्या लेडी डॉनच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबद्दल त्यांनी सांगितले की, 
अहिल्या चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. यात मी लेडी डॉनची भूमिका साकारली आहे. खूप छान चित्रपट बनला आहे. या चित्रपटाला चित्रपट महोत्सवात पुरस्कारही मिळाले आहेत. प्रीतम कांगणे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तिने पोलिस ऑफिसरची भूमिका आहे. माझे निगेटिव्ह पात्र आहे. 

अहिल्या या चित्रपटात प्रीतम व प्रिया बेर्डे यांच्यासह रोहित सावंत, अमोल कागणे, प्रमोद पवार, नूतन जयंत, निशा परूळेकर ही कलाकार मंडळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

प्रचंड कष्ट करून आयपीएस झालेल्या एका महत्त्वाकांक्षी महिला पोलीस अधिकाऱ्याची रंजक कथा अहिल्या चित्रपटात मांडण्यात आली आहे. 
 


Web Title: this Marathi actress will be played Lady Don, know about how
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.