The Marathi actress took the lottery ... the role of the actress to act in the film 'Eicase 2' | या मराठी अभिनेत्रीला लागली लॉटरी... 'इसीस 2' या इंटरनॅशनल सिनेमात साकारणार ही भूमिका
या मराठी अभिनेत्रीला लागली लॉटरी... 'इसीस 2' या इंटरनॅशनल सिनेमात साकारणार ही भूमिका
मनिषा केळकरने आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत आहे. तिच्या आजवरच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. मनिषाला आता एका चित्रपटाची लॉटरी लागली आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण आता मराठी, हिंदी चित्रपटानंतर इंग्रजी चित्रपटामध्ये झळकणार आहे. इसीस हा चित्रपट आपल्याला हिंदीत पाहायला मिळाला होता. पण आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांना इंग्रजीत पाहायला मिळणार असून या चित्रपटात मनिषा एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मनिषाचा हा पहिला इंग्रजी चित्रपट असला तरी तिने याआधी इनफ इज इनफ या इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांचा वापर असलेल्या शॉर्ट फिल्म मध्ये काम केले होते. या शॉर्ट फिल्मचे अनेक फेस्टिव्हमध्ये कौतुक करण्यात आले होते. या शॉर्ट फिल्ममधील भूमिकेसाठी मनिषाला स्पर्श मुंबई फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. 
मनीषा केळकर 'इसीस 2' या इंटरनॅशनल इंग्रजी सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून या चित्रपटातील भूमिका तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन युवा अभिनेता युवराज कुमार करणार असून मनीषा एका बंगाली तरुणीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. बंगाली व्यक्तिरेखा असल्याने त्यासाठी बंगाली भाषेचे धडे मनिषाला सिनेमाचे संवाद लेखक हरीश भिमानी देत आहेत. या सिनेमाची पटकथा मनिषाचा भाऊ हेमंत केळकर याने लिहिली आहे. 
विमान अपहरण, आतंकवाद या विषयावार आधारित हा सिनेमा मनिषाचा पहिला इंग्रजी सिनेमा आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास मुंबई मध्ये नुकतीच सुरुवात झाली असून अनेक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा सिनेमा पाठविण्यात येणार आहे. मुंबई मधील कांदिवली परिसरातील एका कॉलेजमध्ये या चित्रपटाचा सेट उभारण्यात आला आहे. 
इसीस २ ची कथा विमान अपहरण आणि अतिरेकी कारवायांवर आधारित असून युएसएमधून भारतात यायला निघालेल्या विमानाचे अतिरेकी अपहरण करतात. त्यानंतर प्रवाशांची सुटका करण्यासाठी काय काय केले जाते हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  

manisha kelkar

Also Read : मनीषा केळकरचे मान्सून फोटोशुट

Web Title: The Marathi actress took the lottery ... the role of the actress to act in the film 'Eicase 2'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.